क्रेनखाली दबून ड्रायव्हरचा मृत्यू

Foto
 पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या सॅटेलाईट या केमिकल कंपनीत जास्तीचा भार टाकल्याने क्रेन पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला.
दिलीप रामराम  कुर्दे (रा. तिसगाव, वाळूज परिसर) असे या दुर्घटनेत ठार झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. ते माल घेऊन या कंपनीत आले होते.  क्रेनखाली दबून त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. या कंपनीतील ही अपघाताची दुसरी घटना असून, घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास सुरू आहे. सदरील चालक हा आयशर वाहनात लोखंड घेऊन आला होता. त्यातच ही दुर्घटना घडली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker